Easy Tips : थंडा-थंडा कूल कूल… या सोप्या युक्तीने फ्रीजशिवायही मिळेल थंडगार पाणी, फक्त वापरा 1 पदार्थ
फ्रिजमधील अति थंड पाणी घशासाठी हानिकारक असल्याने, मातीच्या भांड्याचा वापर करून पाणी थंड करणे ही एक आरोग्यदायी आणि जुनी युक्ती आहे. उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरशिवाय घरी नैसर्गिकरित्या पाणी थंड कसं करावं, हे जाणून घेऊया.

उन्हाळ्याची गरमी जसजशी वाढते, तसतशी आपल्याला जास्त तहान लागते. बऱ्याच लोकांना थंडगार पाणी प्यायला हवं असतं. (Photo Credit - Whisk AI)

आपण कितीही ज्यूस, शेक किंवा कोल्ड ड्रिंक्स प्यायलो, तरी खरी तहान ही पाण्यानेच भागते. मात्र, फ्रिजमधील जास्त थंड पाणी हे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांच्या घशासाठी हानिकारक ठरू शकते. (Photo Credit - Whisk AI)

अशा परिस्थितीत, फ्रीजशिवाय, घरी नैसर्गिकरित्या पाणी थंड करू शकतो का? अनेक वर्षांपूर्वी, जेव्हा फ्रीजचा सोधही लागला नव्हता, तेव्हा लोकं मातीच्या भांड्यात पाणी साठवत असतं आणि ते गारेगार व्हायचं. एका सोप्या युक्तीचा वापर केला, तर माठातलं पाणीदेखील फ्रीजपणे थंडगार होईल. (Photo Credit - Whisk AI)

जर तुम्ही नवीन मातीचं भांडं किंवा माठ घरी आणला असेल तर आधी तो स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा चांगला धुवा. त्यानंतर, ते भांडं किंवा माठ पाण्याने पूर्णपणे भरा आणि त्यावर झाकण ठेवा. भांड्यावर झाकण ठेवून ते 4 ते 5 तास तसंच ठेवा आणि नंतर ते पाणी काढून टाका. (Photo Credit - Whisk AI)

यानंतर, भांड्यात अर्धा ग्लास पाणी घालून त्यात थोडे सैंधव मीठ टाका आणि ते मीठ भांड्याला सर्व बाजूंना लागेपर्यंत हाताने चोळा. यानंतर, ते दोन ते तीन तास तसेच राहू द्या आणि मग माठं किंवा मातीचं भांड पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा. (Photo Credit - Whisk AI)

फक्त या एका युक्तीने तुम्ही तुमच्या भांड्यातील पाणी थंड करू शकता. पण जर तुमच्या घरी आधीपासूनच एखादं जुनं भांडे असेल, तर तेही पाण्याने स्वच्छ धुऊन, त्यात मीठ घालून चांगलं घासा आणि नंतर ते भांडे 2-3 तास तसंच ठेवून द्या. नंतर हे भांड एकदा स्वच्छ धुवून त्यात प्यायचं भरा. या युक्तीने, तुम्हाला घरच्यां घरी फ्रिजसारखे थंड पाणी मिळू शकेल. (Photo Credit - Whisk AI)