
आजच्या डिजीटल युगात स्मार्टफोन केवळ एक संपर्काचे साधन नाही, तर तो आपल्या वैयक्तिक माहितीचा खजिना मानला जातो. आपल्या स्मार्टफोनमध्ये बँकेशी संबंधित कागदपत्रे, फोटो आणि महत्त्वाचे ओळखपत्र सर्व काही मोबाईलमध्ये सुरक्षित असते.

मात्र, हल्ली इंटरनेटचा वाढता वापर आणि सायबर गुन्हेगारीमुळे स्मार्टफोन हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामळे तुमचा स्मार्टफोन तुम्ही घरात असतानाही हॅक होऊ शकतो. यामुळे जर तुम्हाला तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर खालील ५ सोप्या नक्की माहिती करुन घ्या.

रेल्वे स्टेशन, हॉटेल किंवा बस स्टॉपवर मिळणारे 'फ्री' वाय-फाय वापरणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. सायबर गुन्हेगार अशा नेटवर्कमधून तुमच्या फोनमध्ये मालवेअर (सॉफ्टवेअर) सहज इन्स्टॉल करू शकतात. त्याद्वारे ते तुमच्या डेटावर लक्ष ठेवू शकतात. त्यामुळे शक्यतो सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा.

जर तुम्हाला सार्वजनिक वाय-फाय वापरायचेच असेल, तर VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. VPN तुमचा डेटा ट्रान्झिटमध्ये सुरक्षित ठेवतो. तसेच तुमच्या डिजीटल हालचालींना गुप्त ठेवतो. यामुळे तुमची ओळख, स्थान आणि ब्राउझिंग अॅक्टिव्हिटी सुरक्षित राहते.

१२३४५ किंवा ABCD यांसारखे सोपे पासवर्ड चुकूनही मोबाईलला ठेवण्याची चूक करू नका. तसेच तुमचा जन्मदिवस किंवा तुमच्याबद्दलची सहज उपलब्ध असलेली माहिती पासवर्ड म्हणून वापरु नका. तुमचा पासवर्ड लांब, गुंतागुंतीचा आणि त्यात विशेष चिन्हे यांचा समावेश असलेला असावा.

हल्ली सर्वच स्मार्टफोनमध्ये Face Unlock हे फीचर पाहायला मिळते. मात्र सुरक्षा तज्ज्ञांच्या मते ते पिन किंवा पॅटर्न पासवर्डपेक्षा खूप कमकुवत असते. ते सहज क्रॅक होऊ शकते. तुमच्या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी मजबूत पिन किंवा गुंतागुंतीचा पॅटर्न वापरणे अधिक चांगले ठरते.

तुम्ही नवीन अॅप इन्स्टॉल करता तेव्हा ते कोणत्या परवानग्या मागत आहे, हे नक्की तपासा. अनेक लोक गरज नसतानाही फोटो, कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन यांसारख्या परवानग्या ओके करतात. ज्या अॅपला खरोखर गरज नाही, त्याला ती परवानगी देऊ नका.

या सोप्या टिप्स तुमच्या स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इंटरनेटच्या जगात सायबर गुन्हेगारीपासून सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.