Pre-workout foods : वर्कआऊटपूर्वी खा हे 4 पदार्थ, मिळेल भरपूर एनर्जी

| Updated on: Jan 31, 2023 | 3:04 PM

वर्कआउट करण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. याच्या मदतीने तुम्ही चांगला व्यायाम करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही आहारात कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता.Exercise

1 / 5
व्यायाम करण्यापूर्वी, तुम्ही कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ खाऊ शकता. त्यांच्याकडून तुम्हाला ऊर्जा मिळते. हे पदार्थ तुमचा स्टॅमिना वाढवण्याचे काम करतात. यामुळे मसल्स रिकव्हरीलाही मदत मिळते. आपण कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकतो, ते जाणून घेऊया.

2 / 5
 केळं - केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते. यामुळे तुमची कार्यक्षमता सुधारते. हे शरीरातील चरबीचे उर्जेमध्ये रूपांतर करते. याने तुमची पचनक्रियाही निरोगी राहते.

3 / 5
 ड्रायफ्रुट्स - ड्रायफ्रुट्समध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट आणि फायबर असते. त्यात काही प्रमाणात कार्बोहायड्रेटही असतात. ते ऊर्जा पातळी वाढवण्याचे काम करतात. ओट्समध्ये मिसळूनही तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता.

4 / 5
फळं आणि ग्रीक योगर्ट - फळं आणि ग्रीक योगर्ट यांचे मिश्रण आरोग्यासाठी खूप चांगले आहे. फळं ही कार्बोहायड्रेट्सचे आणि ग्रीक दही प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. व्यायामापूर्वी ते खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

5 / 5
पीनट बटर टोस्ट - स्नॅक म्हणून व्यायामापूर्वी तुम्ही पीनट बटर टोस्ट खाऊ शकता. त्यात कार्ब्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट असते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक देखील असतात.