Foods For Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

| Updated on: Nov 03, 2022 | 11:23 AM

1 / 5
डेंग्यूच्या तापामुळे डोकेदुखी, उलटी होणे, सांधेदुखी असा त्रास होऊ लागतो. या तापात प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. अशा परिस्थितीत आपल्या खाण्या-पिण्याची नीट काळजी घेणे खूप गरजेचे असते. प्लेटलेट्सची संख्या वाढावी, लवकर बरे वाटावे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

2 / 5
नारळाचं पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डेंग्यूने ग्रस्त असलेल्या लोकांनी दररोज 1 ते 2 ग्लास नारळ पाणी प्यावे. त्यात पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. हे इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास मदत करते.

3 / 5
हर्बल टीचे सेवन केल्याने झपाट्याने रिकव्हरी होते. नारळ पाणी आणि गरम पाणी पिण्याव्यतिरिक्त, तुम्ही हर्बल टी पिऊ शकता. हे प्यायल्याने मळमळ आणि थकवा वाटणे, या आपले संरक्षण होते.

4 / 5
डेंग्यूमुळे येणारा ताप बरा करण्यासाठी पपईची पाने हा सर्वात प्रभावी उपाय आहे. तुम्ही पपईच्या पानांचा रस सेवन करू शकता.  तसेच पपईची ताजी पाने पाण्यात उकळून त्याचा काढा पिऊ शकता.

5 / 5
मेथीचे दाणे हे डेंग्यूच्या तापावर उपचार करण्यास मदत करतात. ते डोकेदुखी आणि सांधेदुखी दूर करण्याचे कार्य करतात. मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने ताप कमी होण्यास मदत मिळते.  तुम्ही मेथीच्या दाण्यांचे सेवन चहाच्या स्वरुपातही करू शकता.