सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या हृदय, रक्तदाब आणि वजनावर होणारे फायदे आणि योग्य पद्धत.

| Updated on: Jun 09, 2026 | 3:46 PM
1 / 6
भारतीय स्वयंपाकघरात लसणाचा वापर केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर आयुर्वेदात त्याला औषधी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असते. अनेक आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात.

2 / 6
लसणामध्ये अ‍ॅलिसिन (Allicin) नावाचे मुख्य सल्फर कम्पाउंड असते, जे औषधासारखे काम करते. पण सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक किंवा दोन पाकळी खाल्ल्याने शरीरात कोणते सकारात्मक बदल घडतात, त्याच्या अतिसेवनाने काय तोटे होऊ शकतात, याबद्दलची आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

3 / 6
नियमितपणे रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल (LDL) ची पातळी कमी होण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

4 / 6
लसणामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तवाहिन्या विस्फारतात आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या रुग्णांना रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते.

5 / 6
लसणात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. सकाळी याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर व्हायरल इन्फेक्शन्सचा धोका टळतो.

6 / 6
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनसंस्थेतील टाकाऊ आणि विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात. यामुळे यकृताचे (Liver) आरोग्य सुधारते. तसेच बद्धकोष्ठता, गॅस सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसूण शरीराचे मेटॅबॉलिझम वाढवतो. सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते, परिणामी वजन वेगाने कमी होते.

Follow Us