
अनेकजण सकाळी झोपेतून उठल्यानंतर दुधाच्या ग्लासने आपली सकाळची सुरूवात करतात. हेच नाही तर बरेच लोक उपाशी पोटी दही देखील खातात.

उपाशी पोटी दूध पिणे किंवा दही खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळे उपाशी पोटी दुध किंवा दही खाणे टाळाच.

पोट फुगणे, आम्लपित्त किंवा पोट खराब होणे यासारख्या समस्या सकाळी उपाशी पोटी दूध पिल्याने आणि दही खाल्याने होऊ शकतात.

दुग्धजन्य पदार्थांमध्ये नैसर्गिक लॅक्टिक अॅसिड असते जे पोटात आम्ल निर्माण करते. त्यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवते.

कधीकधी दह्यामध्ये असलेले निरोगी बॅक्टेरिया एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात, तर काही लोक रिकाम्या पोटी खातात यामुळे आम्लपित्ताची समस्या होऊ शकते.