
निरोगी आरोग्यासाठी पपई खाणे अत्यंत फायदेशीर आहे. हिवाळ्यात मार्केटमध्ये ताज्या आणि छान पपई येतात. पपईमध्ये अनेक पोषक घटक असतात. मात्र. काही लोकांनी अजिबातच पपई खाऊ नये.

सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये अनेकांना मुळव्याधाचा त्रास होतो. ज्या लोकांना मुळव्याधाचा त्रास आहे, अशांनी शक्यतो पपईचे सेवन पूर्णपणे टाळाले. कारण त्रास अधिक वाढू शकतो.

पपई गरम असते. त्यामध्ये जर मुळव्याध असलेल्या व्यक्तीने पपईचे सेवन केले तर त्रास अधिक होईल. हा पण आठ दिवसातून एकदा कमी प्रमाणात पपई खाऊ शकता.

पपई त्वचेसाठी फायदेशीर असते. पपई चेहऱ्याला लावल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात. जर तुम्हाला त्वचेचे काही आजार असतील तर तुम्ही पपईचा वापर करू शकता.

कायम डॉक्टर गर्भवती महिलांना पपई अजिबात न खाण्याचा सल्ला देताना दिसतात. पपई खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या वाढण्याची अशावेळी अधिक शक्यता असते.