
बरेच लोक मुळा खायचा म्हटले की, तोंड वाकडे करतात. मात्र, मुळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. विशेष म्हणजे हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

मुळापासून आपण विविध पदार्थ तयार करून आहारात समाविष्ट करू शकता. हिवाळ्यात मुळा आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक असतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याच्या संरक्षण होण्यास मदत होते.

मुळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करते. शक्यतो नाश्त्यामध्ये मुळ्याच्या समावेश करा, मुळ्यात व्हिटॅमिन सी देखील असते.

मुळ्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता दूर होते अनेक अँटीऑक्सिडंट्स त्यामध्ये असतात. नाश्त्यामध्ये तुम्ही मुळ्याच्या पराठ्यांचा समावेश करू शकता.