
शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्या ईडीने अटक केली. त्यानंतर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे चौकशी केली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: घरी आल्याने राऊत यांच्या मातोश्रींना भरून आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना धीर दिला.

या भेटीवेळी संजय राऊत यांची पत्नी , दोन्ही मुली , राऊतांची आई, इतर कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. ईडीने काल नेमकी कश्याप्रकारे चौकशी केली अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. तसेच तपास दारामायण अधिकाऱ्याने काही त्रास दिला का अशी चौकशीही त्यांनी केली.

मातोश्री सविता राऊत यांचा हात घेत त्यांना धीर दिला. तसेच आम्ही सर्व या प्रकरणात लक्ष घालून आहोत. राऊतांसाठी कायदेशीर लढाई लढू, असंही उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांना सांगितल्याचं म्हटले जात आहे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र वायकर आदी नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मातोश्री या निवासस्थानी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या मातोश्री, पत्नी आणि मुलीला धीर देत घाबरू नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे, असं सांगितलं.