
एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहेत. त्यामुळे संपूर्ण खान्देशातून खडसे समर्थकांनी मुंबईत हजेरी लावली.

खान्देशातून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मुंबईत आले आहेत.

'आमचा भाऊ, नाथा भाऊ', 'जिथे भाऊ, तिथे जाऊ, आमचा पक्ष नाथाभाऊ', अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

नाथाभाऊ हे विकास पुरुष आहेत, त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा विकास केला. आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याने आम्हाला त्याचा आनंद आहे. खडसेंशिवाय, खानदेश नाही, अशा प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

आज खडसेंसोबत 72 खडसे समर्थक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

प्रवेशापूर्वी चर्चगेट येथील खडसेंच्या घराबाहेरही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

यावेळी खडसे समर्थकांनी ढोलताशे वाजवत जल्लोष केला.