Election Commission : निवडणुक आयोगाच्या बैठकीतील महागड्या पाण्याची चर्चा! 1L ची किंमत ऐकून थक्कच व्हाल
निवडणूक आयोगाच्या बैठकीतील आवा ब्रँडच्या महागड्या पाण्याच्या बाटल्यांची सोशल मीडियावर चर्चा, 250 मिली बाटलीची किंमत सुमारे 125 रुपये असल्याने पाण्याच्या दराने सर्वांचे लक्ष वेधले.

भारतीय निवडणूक आयोगाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवलेल्या पाण्याच्या छोट्या बाटल्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
साध्या प्लास्टिकच्या बाटल्या नसून काचेच्या या महागड्या बाटल्या पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. या पाण्याची किंमत एका लीटरसाठी सुमारे 500 रुपये इतकी येते, हे समजल्यावर लोकांना धक्का बसला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह तीनही आयुक्त या बैठकीत उपस्थित होते. बैठकीच्या अधिकृत छायाचित्रात टेबलावर ‘आवा’ (Aava) ब्रँडच्या छोट्या काचेच्या बाटल्या स्पष्टपणे दिसत होत्या. या बाटल्या 250 मिली क्षमतेच्या आहेत.
250 मिलीच्या एका बाटलीची किंमत सुमारे 125 रुपये पडते. या हिशेबाने एका लीटर पाण्याची किंमत सुमारे 500 रुपये होते. आठ बाटल्यांचा (250 मिली प्रत्येकी) सेट सध्या सुमारे 999 रुपयांना उपलब्ध आहे.
आवा हे नैसर्गिक मिनरल वॉटर असून त्याचा उगम अरावली पर्वतरांगांमध्ये आहे. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बायकार्बोनेटसारखी नैसर्गिक खनिजे असतात. प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटल्या वापरल्या जात असल्याने हे पाणी पर्यावरणपूरक मानले जाते.
सामान्य लोकांसाठी 10-20 रुपयांत मिळणाऱ्या पाण्याच्या तुलनेत हे पाणी खूपच महाग असल्याने सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीतील या छोट्या बाटल्यांनी बैठकीच्या विषयापेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले आहे.