Electric Kettle: इलेक्ट्रीक किटलीमधील चहा -कॉफीचे डाग असे हलक्या हाताने काढा,पाच मिनिटांत भांडे होईल लख्ख

How To Clean Electric Kettle: चहाची इलेक्ट्रिक किटलीमध्ये चहा उकळल्यानंतर डाग जमतात. मात्र, इलेक्ट्रिक किटली साधारण स्टीलच्या भांड्याप्रमाणे पाण्यात बुडवून किंवा तारेच्या काथ्याने घासून धुता येत नाही. त्यामुळे आज आपण इलेक्टिक किटलीला आतून स्वच्छ करायचे हे पाहूयात..

| Updated on: Oct 07, 2026 | 11:13 PM
1 / 7
थंडीत चहा आणि गरम पाणी करण्यासाठी सर्वजण इलेक्ट्रीक केटलचा वापर करतात. परंतू वारंवार चहा आणि कॉफी शिजवल्याने आतून केटलला डाग पडतात. हे डाग वारंवार साचून चहाला वेगळाच वास येतो आणि त्याची चवही बिघडते. त्यामुळे हे डाग काढण्यासाठी सोपी ट्रिक पाहूयात.

थंडीत चहा आणि गरम पाणी करण्यासाठी सर्वजण इलेक्ट्रीक केटलचा वापर करतात. परंतू वारंवार चहा आणि कॉफी शिजवल्याने आतून केटलला डाग पडतात. हे डाग वारंवार साचून चहाला वेगळाच वास येतो आणि त्याची चवही बिघडते. त्यामुळे हे डाग काढण्यासाठी सोपी ट्रिक पाहूयात.

2 / 7

Electric Kettle हे एक इलेक्ट्रॉनिक गॅझेट असून याला नॉर्मल भांड्याप्रमाणे पाण्यात बुडवून वा लोखंडी काथ्याने घासून स्वच्छ करता येत नाही. त्यामुळे हे जिद्दी डाग काढण्यासाठी पांढरे व्हिनेगर आणि बेकींग सोडा कामी येतो. तुम्ही कोणत्याही कटकटी शिवाय याने पाच मिनिटात केटल आत लख्खं स्वच्छ करु शकता. चला तर इलेक्ट्रिक केटलला स्वच्छ करण्याचे सोपे उपाय.

3 / 7

सामुग्री आणि सफाई करण्याची पद्धत - सामुग्री: १ कप पांढरे व्हीनेगर वा २ लिंबूंचा रस, एक मोठा चमचा बेकिंग सोडा, २ कप पाणी डिशवॉश लिक्विड आणि् एक सॉफ्ट स्पंज/सूती कपडा

4 / 7

व्हाईट व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण तयार करावे. इलेक्ट्रिक केटलमध्ये एक कप व्हाईट व्हिनेगर आणि दोन कप पाणी टाकावे. ( म्हणजे घट्ट डागांची जागा संपूर्ण बुडले. )

5 / 7

उकळावे आणि थंड करावे - केटलचा प्लग लावून ते स्विच ऑन करावे आणि चांगले उकळावे. उकळी आल्यानंतर केटल बंद करावी. या गरम द्रावणाला १५ ते २० मिनिटे केटलमध्ये राहु द्यावे. त्यानंतर व्हिनेगरचे एसिड जमलेल्या डागांना हलके करेल.

6 / 7

बेकिंग सोड्याने स्पंज करावे : केटलीतील द्रावणाला सिंकमध्ये टाकावे.आता केटलमध्ये एक चमचा बेकिंग सोडा शिंपडावा. एका सॉफ्ट स्पंजवर डिशवॉश लिक्विड घेऊन केटल आतून हलक्या हाताने स्वच्छ करावी. सर्व पिवळे आणि करपलले डाग लगेच निघतील.

7 / 7

धुवा आणि कोरडी करा : पाणी केवळ केटलमध्ये टाकावे. तळाता इलेक्ट्रिक बेस भिजू देऊ नये. केटलचा आतला भाग साध्या पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ खंगळून धुवावा. बाहेरील भाग ओल्या सुती कपड्याने पुसावा आणि नंतर कोरड्या टॉवेलने पुसून कोरडा करावा. हवेत भांडे वाळत ठेवावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us