‘एलिझाबेथ एकादशी’ फेम नंदिता पाटकरने दुसऱ्यांदा थाटला संसार; कोण आहे पती?

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता पाटकरने दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 4:15 PM
1 / 5
'एलिझाबेथ एकादशी', 'बाबा', 'बालभारती', 'पंचक', 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' यांसारख्या चित्रपटांमध्ये सहजसुंदर भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री नंदिता पाटकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

'एलिझाबेथ एकादशी', 'बाबा', 'बालभारती', 'पंचक', 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' यांसारख्या चित्रपटांमध्ये सहजसुंदर भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री नंदिता पाटकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

2 / 5

नंदिता पाटकरने नाट्य दिग्दर्शक विपुल महागांवकरशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नंदिता आणि विपुल यांच्यावर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

3 / 5

'पै पैशाची गोष्ट' आणि 'उद्ध्वस्त धर्मशाळा' यांसारख्या नाटकांमधून विपुल महागांवकरने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तर नंदिताच्या करिअरची सुरुवातही नाटकांपासूनच झाली. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटाने तिचं नशीब पालटलं.

4 / 5

'खारी बिस्किट', 'लालबागची राणी', 'पाणी' यांसारख्या चित्रपटांमध्येही नंदिताने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. नंदिताचं हे दुसरं लग्न आहे. एका मुलाखतीत ती तिच्या पहिल्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.

5 / 5

पहिल्या लग्नानंतर काही काळातच नंदिताचा घटस्फोट झाला होता. पतीपासून विभक्त झाल्यानंतर सगळ्या गोष्टी एकटीनं करणं खूप कठीण गेलं होतं. स्वत:ला सांभाळून इतरांसमोर सतत हसरा चेहरा ठेवणं खूप कठीण असल्याची भावना तिने व्यक्त केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us