Tesla Car : ना स्टिअरिंग ना गिअर, एलॉन मस्क आणणार चमत्कारिक कार, टेस्ला कंपनी काय करतेय?
ते तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहन निर्मिती क्षेत्रातही नवं काहीतरी करत असतात. सध्या ते कोणतेही स्टिअरिंग नसलेली, ब्रेक नसलेली, क्लच नसलेली कार तयार करण्याच्या विचारात आहेत.

अब्जाधीश एलॉन मस्क हे तंत्रज्ञानाच्या मदतीने काय अविष्कार घडवून आणतील हे सांगता येत नाही. अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांच्या स्पेस एक्स या कंपनीने अनेक नवे रेकॉर्ड रचलेले आहेत.
ते तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहन निर्मिती क्षेत्रातही नवं काहीतरी करत असतात. सध्या ते कोणतेही स्टिअरिंग नसलेली, ब्रेक नसलेली, क्लच नसलेली कार तयार करण्याच्या विचारात आहेत. विशेष म्हणजे यावर त्यांनी काम सुरूदेखील केलं आहे.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी टेस्ला कारच्या Y आणि Y L या मॉडेलची नवे व्हर्जन तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. या नव्या मॉडेलमध्ये स्टिअरिंग नसेल. सोबतच या कारमध्ये कोणतेही क्लच, ब्रेक नसेल.
ही कार पूर्णपणे स्वयंचलित असण्याची शक्यता आहे. भविष्यात या कार लोकांना चालवण्यासाठीही विकल्या जाऊ शकतात. एलॉन मस्क यांनीच न्यूयॉर्क टाईम्सच्या डीलबुक समिटमध्ये याची माहिती दिली आहे.
दरम्यान, अशा कारची किंमत काय असेल, ही कार कधी लॉन्च होणार सोबतच अशा कारसाठी उत्पादन खर्च किती येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ही कार कशी असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.