
एखाद्या कर्मचाऱ्याकडे 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून नोकरी नसेल तर ती व्यक्ती पीएफ खात्यातून रक्कम काढू शकते. अशा स्थितीत 75 टक्के रक्कम काढता येऊ शकते.

जर एखाद्या कंपनी तसेच कारखान्याचे कामकाज 6 महिन्यांसाठी बंद झाले असेल तर कर्मचारी त्याची संपूर्ण पीएफ रक्कम काढू शकतो. मात्र जेव्हा कंपनी पुन्हा सुरू होते तेव्हा काढलेली रक्कम 36 हप्त्यांमध्ये परत करावी लागते.

नोकरीवरुन काढल्यानंतर कर्मचारी पीएफ खात्यातून 50 टक्के रक्कम काढू शकतो. मात्र त्या पीएफ धारकाा तो बेरोजगार आहे, याचा पुरावा द्याला लागेल.

कोणत्याही कंपनीचं कामकाज 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी बंद राहिलं तर कर्मचारी पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढू शकतो.

पीएफ धारकाकडे निवृत्तीनंतर 2 पर्याय असतात. पीएफ धारक खात्यातून असलेली सर्व रक्कम एकदाच काढू शकतो. तर दुसरा पर्याय म्हणजे निवृत्ती वेतन (EPS). ईपीएसनुसार पीएफधारकाला दर महिन्याला ठराविक रक्कम म्हणून निवृत्ती वेतन दिलं जातं.