
वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सेमी फायनलच्या शर्यतीत असलेला इंग्लंड संघ बाहेर पडलाय. आठ पैकी दोन सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवता आलाय.

इंग्लंड संघामधील स्टार खेळाडूने शनिवारी होणारा पाकिस्तानचा सामना माझा शेवटता वन डे सामना असू शकतो असं म्हटलं आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून डेव्हि़ड मलान आहे.

इंग्लंड संघाकडून डेव्हिड मलान याने चांगली कामगिरी केली आहे. एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 373 धावा केल्या आहेत.

इंग्लंडसाठी हा माझा शेवटचा सामना असू शकतो आणि त्यानंतर एका नव्या प्रवासाची सुरुवातही असू शकते. या स्पर्धेनंतर कदाचित मला विचार करायला थोडा वेळ मिळेल, असं मलानने म्हटलं आहे.

मलान याने वयाच्या 29 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो टी-२० मध्ये आयसीसी क्रमवारीमध्ये एक नंबरला राहिला होता. त्यासोबतच इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो.