
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच देशाची फाळणी झाली, भारताला 15 ऑगस्ट 19947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या एक दिवस आधीच 14 ऑगस्ट 19947 ला पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र काळाच्या ओघात आपला देश पाकिस्तानच्या प्रचंड पुढे निघून गेला, प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

दुसरीकडे पाकिस्तानला मात्र दहशतवादाने पूर्णपणे पोखरून काढलं आहे, देशात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. पाकिस्तान कर्जाच्या खाईत बुडाला आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानचा हेकेखोरपणा कमी झालेला नाही.

पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे, तिथे अन्न-धान्याची प्रचंड टंचाई असून, तेथील नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

सुरुवातीपासूनच पाकिस्तान हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाले. मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरूच राहिला, भारत पाकिस्तानला अनेक गोष्टी निर्यात करतो. मात्र अशीही एक गोष्ट आहे, जी आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावी लागते.

आजही भारत त्या गोष्टीसाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबू आहे. जवळपास नव्वद टक्के उत्पादन आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावं लागतं जाणून घेऊयात त्या गोष्टीबाबत

ही वस्तू दुसरी -तिसरी कोणती नसून ते आहे काळं मीठ, काळ्या मिठाची मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.काळ्या मिठाचं खूपच थोड्या प्रमाणात उत्पादन भारतामध्ये केलं जातं.

भारतामध्ये होणारे विविध धार्मिक कार्यक्रम,व्रतांमध्ये काळ्या मिठाची गरज असते. काळ्या मिठाला रॉक सॉल्ट नावानं देखील ओळखलं जातं.पाकिस्तानमध्ये काळ्या मिठाची सर्वात जास्त निर्मिती केली जाते.