
यूट्यूबर अरमान मलिक हा नेहमीच चर्चेत असतो. अरमान मलिक याच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे.

आता नुकताच अरमान मलिका हा पायल मलिक हिला घेऊन दुबईला गेलाय. दुबईतील प्रत्येक अपडेट शेअर करताना पायल आणि अरमान दिसत आहेत.

दुसरीकडे कृतिका मलिक ही पायल मलिकचे तीन लेकरं आणि स्वत:चे एक असे चार लेकरांना सांभाळत आहे. कृतिका मलिक देखील प्रत्येक अपडेट ब्लाॅगमध्ये शेअर करताना दिसत आहे.

आता अरमान मलिक आणि पायल मलिक यांचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये अरमान आणि पायल लिपलाॅक करताना दिसत आहेत.

या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, नक्कीच हे फोटो पाहून कृतिका मलिक हिला जलन होत असेल. दुबईतील अनेक फोटो व्हायरल होत आहेत.