
चेहऱ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, जास्तीत जास्त करून घरगुती वस्तूंच्या माध्यमातून फेसपॅक तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

दही हे ज्याप्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे ते आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. दह्याच्या मदतीने आपण काही फेसपॅक तयार करून लावू शकता.

दह्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय पिंपल्सची समस्या कामची दूर होते.

हवे तर आपण दही आणि बेसनसोबतच त्यामध्ये हळद देखील मिक्स करू शकता. यामुळे अधिक त्वचा उजळण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक तयार करावा.

कायम लक्षात ठेवा की, दही, बेसन पीठ आणि हळदीचा फेसपॅक तयार करताना तो लावण्यापूर्वीच तयार करा. कधीही तो तयार करून फ्रीजमध्ये अजिबात ठेऊ नका.