
फलक नाज ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. दिवंगत टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आणि फलक नाज या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र, तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर फलक नाज हिच्या कुटुंबियांवर अत्यंत गंभीर आरोप केले गेले.

फलक नाज हिचा भाऊ शीजान खान याच्यावर याच प्रकरणात 70 दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ आली. तो काळ नक्कीच फलक नाज हिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी इतका सोपा नव्हता. तुनिशाची आई सतत त्यांच्यावर आरोप करताना दिसली.

फलक नाज हिने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. फलक नाज म्हणाली की, तुनिशाच्या आत्महत्येनंतरचा तो काळ फार जास्त वाईट राहिला. मी आणि माझे कुटुंबिय खूप वेगळ्या गोष्टींमधून जात होतो.

इतकेच नाही तर कॅमेऱ्यासमोर बोलण्याची देखील माझी हिंमत होत नव्हती. तो काळ फार वाईट होता. तुनिशा गेल्यानंतर मी माझा आत्मविश्वास गमावला.

यासाठीच मला असा शो हवा होता, ज्यामधील माझा आत्मविश्वास मी परत मिळू शकते. यामुळेच मी बिग बाॅस ओटीटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना फलक नाज दिसली.