Farah Khan : तीनही मुलं घरट्याबाहेर ! फराह खानच्या इमोशनल पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फराह खानची तीनही मुलं पुढील शिक्षणासाठी परदेशात रवाना झाली आहेत. मुलांना कॉलेजसाठी घराबाहेर पाठवताना फराहचा इमोशनल क्षण सोशल मीडियावर दिसला. तिने मुलांसोबतचे काही खास फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या.

| Updated on: Sep 07, 2026 | 10:00 PM
1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान नेहमी चर्चेत असते, सोशल मीडियावरही ती बरीच ॲक्टिव्ह असते. सध्या ती पुन्हा चर्चेत आलीये, पण फिल्म किंवा शोमुळे नव्हे तर सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे. नुकतेच तिने तिच्या तीन मुलांचे —दिवा, अन्या आणि जार— यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्या मुलांनी पुढील शिक्षणासाठी परदेशाची वाट धरल्याचं तिने एका खास पोस्टमधून सांगितलं.

2 / 5

मुलांना कॉलेजला पाठवण्याचा क्षण कोणत्याही आई-वडिलांसाठी भावनिक असतो. फराहसाठी हा क्षण सोपा नव्हता. विशेष म्हणजे तिच्या तीनही मुलांना वेगवेगळ्या शहरांतील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जावं लागणार आहे.

3 / 5

'तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलाला कॉलेजला पाठवणं कठीण आहे, मग ते 3 वेळा करून पहा ! 3 शहरं, तीन कॅम्पस आणि तीन वेळा निरोपाचे क्षण ! माझ्या हृदयाचे तीन तुकडे... तुमचं आयुष्य जगा. पण लक्षात ठेवा, सर्व रस्ते पुन्हा मम्मी-पप्पांकडेच येतात.' अशी एक इमोशनल पोस्ट लिहीत तिने मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि निरोपाच्या क्षणांबद्दल लिहीलं. या पोस्टमध्ये फराहने तिचा पती आणि चित्रपट निर्माते शिरीष कुंदर याचाही मजेशीर अंदाजात उल्लेख केला.

4 / 5

फराहने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आपल्या तीनही मुलांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली. आई आणि मुलांमधील हा भावनिक क्षण चाहत्यांनाही खूप भावला.

5 / 5

यावर बरेच लाईक्स आणि कमेंट्स आल्या. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी देखील यावर कमेंट करत शुभेच्छा दिल्या. ' सर्वात चांगली आई' असं म्हणत चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने तिचं कौतुक केलं. तर शेफ कुणालनेही कमेंट करत फराहच्या मुलांना शुभेच्छा दिल्या. 'बेस्ट मम्मी' अशी आणखी कमेंट अभिनेता सिद्धार्थने या पोस्टवर केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us