रणरणत्या उन्हात शेतकऱ्याने बायकोला बैलासोबत नांगराला जुंपले; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

बैलजोडीवर गेल्या आठवड्यात वीज कोसळल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर शेती करायची तरी कशी? असा प्रश्न शेकऱ्यासमोर उभा राहिला. अशात शेकऱ्याने बायकोलाच बैलाबरोबर जुंपल... अशात शेकऱ्याची परिस्थिती पाहिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला.

| Updated on: Jun 10, 2026 | 1:18 PM
1 / 5
लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने बायकोला दुसऱ्या बैलाच्या जागी नांगराला जुंपल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  5 जून रोजी वीज पडून त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता. काशिनाथ गायकवाड असं त्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटना घडताच मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला. बैल जोडीवर वीज पडल्याने नांगर मोडलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याला स्वतःच्या पत्नीला बैलाबरोबर नांगरालाला जुंपावे लागले आहे.

2 / 5
लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोंबळी गावचे हे शेतकरी आहेत काशिनाथ गायकवाड. घटना घडताच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्यास सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गोशाळेतून बैल तशेतकऱ्याला दिला. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याने शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे.

3 / 5
गायकवाड यांच्या बैलजोडीवर गेल्या आठवड्यात वीज कोसळली, ज्यामध्ये एक बैल मृत्युमुखी पडला. अशात नांगर मोडल्याने पुन्हा शेती कशी कसायची हा सवाल शेतकऱ्याला स्वस्थ बसू देईना. दुसरा बैल खरेदीला पैसे नसल्याने या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पत्नीने बैला बरोबर स्वतःला जुंपून घेतले.

4 / 5
पेरणीची इतर शेतकरी लगबग करीत असताना ,या शेतकरी दांपत्याने शेती कसायचा असा प्रयत्न केला आहे. वीज पडून बैल ठार झालेला असतानाही तातडीची मदत म्हणून शेतकऱ्याला सरकारी काहीच मदत मिळालेली नाही.त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेमुळेही या शेतकरी दांपत्याला बैला बरोबर स्वतःला नांगराला जुंपून घ्यावे लागले आहे.

5 / 5
काशिनाथ गायकवाड हे शेतकरी भूमिहीन आहेत, मात्र गावातल्या अनेकांची शेती ते बटईने कसून खातात. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे. वीज पडली आणि औत मोडला... नांगर मोडल्याने अवस्था बिकट झाली आहे..

Follow Us