
करमाळा तालुक्यातील कुगाव येथील एका शेतकऱ्याची मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.

तिचं नाव सारिका मारकड असं आहे.

सारिका तिच्या मुळ गावी आल्यानंतर हलगी वाजवत, फटाके फोडत गाडीतून सारिका मारकड हिची चिखलठाण व कुगाव या दोन गावात तिच्या कुटूंबियांनी व ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.

या मिरवणुकीत ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने हजेरी लावली.

यावेळी तिच्या मिरवणूकीचे ड्रोन कॅमेरामधून चित्रीकरण करण्यात आले आहे.