
बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. कारखान्यानजीकचा ऊस सोडून इतर जिल्ह्यातून कारखान्यासाठी ऊस आणला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

प्रत्येकवर्षी शेतकरी गुढी उभी करतो, परंतु शेतकऱ्यांनी यंदा बीड जिल्हाधिकाऱ्यारी कार्यालयासमोर काळी गुडी उभी केली आहे.

साखर आयुक्तांना अनेकवेळा निवेदन देऊन देखील अतिरिक्त ऊस प्रश्नावर मार्ग निघत नसल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.

शेतकरी नेते भाई गंगाभीषन थावरे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर काळी गुढी उभारून शासनाचा निषेध व्यक्त केला.