FASTag Annual Pass : ट्रिप्स कसे मोजले जाणार? किती होईल पैशांची बचत?

सध्याचा फास्टॅग राज्यातील रस्ते, स्थानिक संस्था आणि पार्किंग इत्यादींसाठी काम करेल. फास्टॅगचा वार्षिक पास हस्तांतरित करता येत नाही. तो फक्त ज्या फास्टॅगवर वाहन नोंदणीकृत आहे, त्यावरच सक्रिय असेल. दुसऱ्या वाहनावर वापरल्यास तो निष्क्रिय केला जाईल.

| Updated on: Aug 05, 2025 | 2:49 PM
1 / 6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या महिन्यात फास्टॅग वार्षिक पासची घोषणा केली होती. येत्या 15 ऑगस्टपासून देशभरात फास्टॅगचा वार्षिक पास सुरू होणार आहे. या पासमुळे वापरकर्त्यांना निवडक एक्स्प्रेस वेवर संपूर्ण वर्षभर किंवा फक्त 3000 रुपयांच्या किंमतीत 200 फेऱ्यांपर्यंत मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळेल.

2 / 6
फास्टॅग वार्षिक पास फक्त कार, जीप किंवा व्हॅनसारक्या खाजगी वाहनांवर लागू असेल. यात व्यावसायिक वाहनांचा समावेश नाही. वार्षिक पाससाठी वापरकर्त्यांना वेगळा फास्टॅग खरेदी करण्याची आवश्यकता नाही. ते सध्याच्या फास्टॅगवर तो सक्रिय करू शकतील.

3 / 6
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पॉईंट आधारित टोल  प्लाझावर प्रत्येक सिंगल क्रॉसिंगला एकच ट्रिप मानलं जाईल. म्हणजेच एक फेरी (येऊन आणि जाऊन) दोन ट्रिप म्हणून मोजली जाईल. त्याचवेळी बंद टोल प्लाझावरून जाताना, प्रवेश आणि निर्गमन दोन्ही एकच ट्रिप म्हणून मानले जातील.

4 / 6
जर वार्षिक पासची वैधता संपली किंवा 200 ट्रिप पूर्ण झाल्या, तर वापरकर्त्यांना तो पुन्हा खरेदी करावा लागेल. ज्यासाठी त्यांना पुन्हा 3000 रुपये भरावे लागतील. हा वार्षिक पास फक्त त्याच वाहनांच्या नोंदणीकृत फास्टॅगवर सक्रिय केला जाऊ शकतो, ज्यांचा वाहन नोंदणी क्रमांक (VRN) अपटेड केलेला आहे.

5 / 6
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही नियमितपणे प्रवास केला तर वार्षिक फास्टॅग पासमुळे तुम्ही दरमहा सुमारे 7000 ते 8000 रुपये वाचवू शकता. हा वार्षिक पास फक्त राजमार्गयात्रा मोबाइल अॅप किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे सक्रिय केला जाऊ शकतो. त्यामुळे इतर कुठलीही फसवणूक टाळा.

6 / 6
वाहनाची पात्रता पडताळणी केल्यानंतर वापरकर्त्याला मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे ऑनलाइन पेमेंट करावं लागेल. हा पास दोन तासांच्या आत सक्रिय होईल. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्गावर (NE) लागू असेल.