AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची इराणला मोठी मदत, इराणनेही मानले मित्राचे आभार, भारताचं केलं प्रचंड कौतुक

इस्त्रायल, इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत इराणच्या मदतीला धावून आला आहे. त्यानंतर इराणने भारताचं कौतुक करत आभार मानले आहेत.

भारताची इराणला मोठी मदत, इराणनेही मानले मित्राचे आभार, भारताचं केलं प्रचंड कौतुक
motozba khameneiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 7:48 PM
Share

सध्या इराण युद्धामध्ये गुंतला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं असून इराण मोठ्या संकटात सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आता भारत इराणच्या मदतीला धावून आला आहे. या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं असून, मानवतेच्या दृष्टीकोनातून इराणला मदत करण्यासाठी आता अनेक भारतीय नागरिक पुढे आले आहेत. भारतीय नागरिक सढळ हाताने इराणला मदत करत आहेत. भारतीय नागरिकांनी आपली मदत इराणच्या दूतावासाच्या बँक खात्यात जमा केली आहे. याबद्दल इराणने भारताचे आभार मानले आहेत.

इराणच्या दूतावासाकडून सोशल मीडियावर पोस्ट करत भारताचे आभार माण्यात आले आहेत. आम्ही त्या सर्व भारतीय नागरिकांचे आभार मानतो, ज्यांनी आपलं मन मोठं करत इराणला मानवतेच्या दृष्टीकोणातून मदत केली आहे, असं इराणने म्हटलं आहे. यासोबतच इराणच्या दूतावासाकडून जे नागरिक मानवतेच्या दृष्टीकोणातून इराणला मदत करत आहेत, त्याच्यासाठी काही गाइडलाइंन्स देखील जारी करण्यात आल्या आहेत. पैसे पाठवण्यासाठी काही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी इराणने गाइडलाइंन्स जारी केल्या आहेत.

मानवीय दृष्ट्रीकोणातून जी मदत केली जात आहे, त्यासाठी आमचं बँक खातं हे सक्रिय आहे. नागरिक थेट आमच्या खात्यात पैसे ट्रांन्सफर करू शकतात. मात्र आमच्याकडे गूगल पे आणि इतर युपीआयचा पर्याय उपलब्ध नाहीये. आमच्या बँक खात्याला गूगल पे किंवा युपीआयची सुविधा नाहीये, त्यामुळे आम्ही असं आव्हान करतो, की तुम्ही ही मदत थेट आमच्या खात्यात जमा करू शकता, असं इराणने म्हटलं आहे.

इराणचं युद्धात प्रचंड मोठं नुकसान

दरम्यान या युद्धात आतापर्यंत इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या युद्धामध्ये इराणच्या सौनिकांसोबतच अनेक सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ले सुरू असून, या हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल