AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या कर्णधाराचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Cricket Retirement : आपल्या नेतृत्वात टीमला तब्बल 2 आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या दिग्गज कर्णधाराने वयाच्या 38 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. जाणून घ्या या कर्णधाराची खेळाडू म्हणून कारकीर्द कशी राहिली.

Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या कर्णधाराचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
Sarfaraz Ahmed and Rohit SharmaImage Credit source: AP Photo
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 15, 2026 | 7:35 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाची गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चमकदार कामगिरी सुरु आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात नुकताच टी 20i वर्ल्ड कप जिंकला. त्याआधी अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने भारताला त्याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20i वर्ल्ड कप आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. रोहित भारताला चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देणारा एकूण तिसरा तर महेंद्रसिंह धोनी याच्यानंतरचा पहिलाच कर्णधार ठरला. तर 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरलेल्या पाकिस्तानला एकही विजय मिळवता आला नाही. तेव्हापासून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निराशाजनक कामगिरी सुरु आहे. त्यामुळे पाकिस्तानची 2017 पासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा कायम आहे. अशात आता पाकिस्तान क्रिकेटमधून मोठी बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानला 2017 साली आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज सर्फराज अहमद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. सर्फराज याने पाकिस्तान क्रिकेटसाठी फलंदाज, विकेटकीपर आणि कर्णधार अशा तिन्ही भूमिका बजावल्या. सर्फराजने पाकिस्तानचं 100 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व केलं.

सर्फराजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

सर्फराजने वयाच्या 38 व्या वर्षी आणि 15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. सर्फराजने अखेरचा सामना जवळपास अडीच वर्षांआधी डिसेंबर 2023 साली खेळला होता. सर्फराजने त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून सर्फराज टीममधून बाहेरच होता. त्यामुळे सर्फराज कधी न कधी निवृत्ती जाहीर करणार हे निश्चित होतं.

सर्फराजच्या नेतृत्वात पाकिस्तानला 2 आयसीसी ट्रॉफी

सर्फराजने पाकिस्तानला त्याच्या नेतृत्वात 2 आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. पाकिस्तानने 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफी फायनलमध्ये भारतावर 10 विकेट्सने जबरदस्त असा विजय मिळवला होता. तर त्याआधी सर्फराजने पाकिस्तानला 2006 साली अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. मात्र त्यानंतर पाकिस्तानची अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा कायम आहे.

सर्फराजची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

दरम्यान सर्फराज अहमद याने पाकिस्तानचं 54 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 61 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. सर्फराजने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 3 हजार 31, 2 हजार 315 आणि 818 धावा केल्या.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल