
मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय मिडसाईज एसयुव्ही ग्रँड व्हिटाराची जोरदार विक्री होत आहे. या कारवर ग्राहक फेस्टिव्हल सीजनमध्ये 1.28 लाख रुपयांपर्यंतची रक्कम वाचवू शकतो. या कारची एक्स शोरुम किंमत18.43 लाख ते 19.93 लाख रुपयांदरम्यान आहे.

टाटा हॅरियर एसयुव्हीवर ग्राहकांना या महिन्यात 1.20 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये ते 26.44 लाख रुपयांदरम्यान आहे.

फॉक्सवॅगन इंडिया तिची लोकप्रिय एसयुव्ही टायगूनवर ग्राहकांना या सणासुदीत 3 लाख रुपयांपेक्षा अधिकची सवलत देत आहे. या एसयु्व्हीची किंमत 11.70 लाख रुपये ते 20 लाख रुपयांदरम्यान आहे.

होंडा कार्स इंडियाची जोरदार एसयुव्ही एलिवेटवर ग्राहकांना या काळात 75 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होत आहे. होंडा एलिवेटची एक्स शोरूम किंमत 11.91 लाख रुपये ते 16.51 लाख रुपयांपर्यंत आहे.

जीप कंपनीची जबरदस्त एसयुव्ही कंम्पासवर ग्राहकांना सणावारात 3 लाख रुपये ते त्यापेक्षा अधिकचा फायदा होत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत18.99 लाख रुपये ते 28.33 लाख रुपयांपर्यंत आहे.

किआ इंडियाची सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही सेल्टॉसवर ग्राहकांना 1.3 लाख रुपयांपर्यंताचा फायदा होत आहे. किआ सेल्टॉसची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये ते 20.37 लाख रुपयांपर्यंत आहे.