
क्रिकेटची मॅच असो वा कबड्डीची. सामना आंतरराष्ट्रीय असो किंवा स्थानिक. सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या भावना तीव्र असतात. अशावेळी एखादी छोटीशी घटना सुद्धा मोठ्या वादाच कारण ठरते.

मुंबईत घाटकोपर येथे लालबत्ती क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या घाटकोपर आमदार चषक 2025 कबड्डी स्पर्धेत अशीच एक घटना घडली.

मध्यरात्री याच स्पर्धेमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

काल स्पर्धेचा तिसरा दिवस होता आणि याच तिसऱ्या दिवशी रात्री दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती आहे. मैदानात शिवीगाळ करण्यात आली.

एका खेळाडूला अनेक जणांनी मिळून मारहाण केली. त्याच्या डोक्यात खुर्ची घातली. कबड्डीच ग्राऊंड हाणामारीच मैदाना बनलं होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.