AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडिया 3 सामने खेळणार, पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध भिडणार, मॅच कधी कुठे?

India vs Pakistan : हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनिमित्ताने भारत आणि पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असणार आहेत. त्या व्यतिरिक्त टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान असणार? जाणून घ्या.

IND vs PAK : टीम इंडिया 3 सामने खेळणार, पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध भिडणार, मॅच कधी कुठे?
India vs Pakistan FansImage Credit source: Getty
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 19, 2026 | 4:24 PM
Share

भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी आणि एकूण तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता काही महिन्यांनी हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एफआयएच हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन हे बेल्जिअम आणि नेदरलँड्समध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा थरार हा 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेसाठी गट जाहीर करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे भारत आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हॉकी चाहत्यांना या वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ असणार आहे.

मेन्स टीम इंडियाचा पहिला सामना कधी?

हॉकी मेन्स टीम इंडियाचा या मोहिमेतील पहिला सामना हा 15 ऑगस्टला होणार आहे. टीम इंडियासमोर वेल्सचं आव्हान असणार आहे. त्यानंतर टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचं आव्हान असणार आहे. हा सामना 17 ऑगस्टला होणार आहे. तर 19 ऑगस्टला टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे.

मेन्स टीम इंडिया या मोहिमेतील सर्व सामने एकाच ठिकाणी खेळणार आहे. या सामन्यांचं आयोजन हे नेदरलँड्समधील एम्स्टेलवीनमध्ये  करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान एकत्र करण्यात आलं आहे. महिला आणि पुरुष वर्ल्ड कप स्पर्धेत 16-16 संघ सहभागी होणार आहेत.

वुमन्स हॉकी टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये?

वुमन्स हॉकी टीम इंडियाचा डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या डी ग्रुपमध्ये इंग्लंड, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. वुमन्स टीम इंडिया साखळी फेरीतील सर्व सामने हे नेदरलँड्समध्ये खेळणार आहे.

टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडचं वेळापत्रक

विरुद्ध चीन, 16 ऑगस्ट.

विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 18 ऑगस्ट.

विरुद्ध इंग्लंड, 20 ऑगस्ट.

दरम्यान वुमन्स टीम इंडिया या मोहिमेतील पहिल्या सामन्यात चीन विरुद्ध खेळणार आहे. त्यानतंर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. तर महिला ब्रिगेड साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात