थिएटर आणि OTT नंतर आता घरबसल्या मोफत पाहता येणार ‘धुरंधर’चित्रपट, जाणून घ्या वेळ आणि तारिख

थिएटर आणि OTT नंतर आता या ठिकाणी तुम्ही रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट फ्रीमध्ये पाहू शकता. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: May 27, 2026 | 1:55 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांनी विक्रमी कमाई करत रणवीरला पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांनी विक्रमी कमाई करत रणवीरला पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.

2 / 5

‘धुरंधर’ने तब्बल 1300 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली तर ‘धुरंधर 2’ने 1700 कोटी रुपयांचा टप्पा पार करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

3 / 5

आता रणवीरच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यांनी अद्याप ‘धुरंधर’ पाहिला नाही, त्यांना हा चित्रपट आता घरबसल्या मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे.

4 / 5

मिळालेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 30 मे रोजी होणार आहे. हा चित्रपट संध्याकाळी 7 वाजता स्टार गोल्ड, स्टार गोल्ड 2 आणि कलर्स सिनेप्लेक्स या वाहिन्यांवर प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटर किंवा ओटीटीशिवाय आता टीव्हीवरही हा ब्लॉकबस्टर चित्रपट पाहता येणार आहे.

5 / 5

दरम्यान, ‘धुरंधर 2’ नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असल्याने त्याचा टीव्ही प्रीमियर अद्याप जाहीर झालेला नाही. हा चित्रपट आधी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्यानंतरच टीव्हीवर दाखवला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us