रेल्वेत फटाके घेऊन जाऊ शकता? जाणून घ्या भारतीय रेल्वेचा नियम नाही तर..
रेल्वेमध्ये अनेकजण फटाके घेऊन जातात. मात्र, रेल्वेचे नियम माहिती नसतानाही हे लोक रेल्वेने फटाके नेतात. जर तुम्हीही असे करत असाल तर तात्काळ थांबा. जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्ही मोठ्या वादात सापडू शकतात.

दिवाळीत मोठ्या प्रमााणात फटाक्यांची खरेदी केली जाते. फटाक्यांवर बंदी असतानाही लोकांकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी केली जाते. फटाक्यांशिवाय दिवाळीच पूर्ण होत नाही.
बरेच लोक ट्रेनमधूनही फटाके घेऊन जातात.पण ट्रेनमधून फटाके घेऊन जाऊ शकतो की, नाही याबाबत जाणून घेऊयात भारतीय रेल्वेचा याबाबत नक्की काय नियम आहे हे पाहा.
जर तुम्ही भारतीय रेल्वेने जात असाल आणि फटाकेसोबत घेऊन जात असाल तर तुम्हाला मोठा दंड बसू शकतो. रेल्वेने ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ नेण्यास बंदी आहे. फटाके हे ज्वलनशील असल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
बॅगेतील फटाक्यांच्या घर्षणाने आग लागण्याची शक्यता असते. एखादी छोटीशी चूक ज्यामुळे पूर्ण डब्ब्यालाही आग लागू शकते. जर कोणी फटाके नेताना सापडले तर मोठा दंड त्याच्यावर आकारला जाऊ शकतो.
दिवाळीच्या काळात हा धोका टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून तपासणी केली जाते. हेच नाही तर थेट गुन्हाही दाखल होऊ शकतो. कलम 164 नुसार, प्रतिबंधित स्फोटक किंवा धोकादायक पदार्थ नेल्याने गुन्हाची दाखल होऊ शकतो.