AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरीवर बुरशीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनो तातडीने करा अगोदर हे काम

Tur Pest Control: ढगाळ वातावरणामुळे राज्यात तूर पिकावर अळी आणि बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. काय करावी उपाय योजना

तुरीवर बुरशीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनो तातडीने करा अगोदर हे काम
तुरीवर बुरशीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनो तातडीने करा अगोदर हे काम
| Updated on: Nov 07, 2026 | 1:35 PM
Share

Tur Pest Control: आधीच दुष्काळाच्या संकटात असलेले शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. कारण जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी तुर पिकावर बुरशी, अळी आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सध्या शेतकरी बांधव चिंतेत आहे, जाफराबाद तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या तुर पिकावर या विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना पुन्हा एकदा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी महागड्या औषधाची फवारणी करावी लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

आधी करा या उपाययोजना

एकात्मिक कीड व्यवस्थापन

तुरीवर आळीच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पक्षांचे थांबे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. ठिकठिकाणी पक्षांना बसण्यासाठी थांबे तयार करा. यामुळे पक्षी तुरीमधील घाटेआळे सहज फस्त करतील. कामगंध सापळे लावून पतंगांचे नियंत्रण करता येईल.

रासायनिक आणि जैविक फवारणी

बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेली बुरशीनाशक, कॉर्बेन्डाझिम अथवा कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि अळीच्य नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकाची क्विनॉलफॉस अथवा इतर कीटकनाशकाचा वापर करता येईल. कृषी मार्गदर्शन घेऊनच फवारणी करणे योग्य ठरेल. फवारणी नेहमी सकाळी अथवा संध्याकाळी थंड वातावरण असताना करावी.

पाणी व्यवस्थापन

ढगाळ वातावरणाचा तुरीवर परिणाम होत आहे. सततच्या दमट वातावरणामुळे मुळाशी अथवा पानांवर बुरशी वाढते. यामुळे शेतात पाणी साचू देऊ नका अथवा हवा खेळती राहील याची काळजी घ्या.

कृषी विभागाची मदत घ्या

शेतकऱ्यांनी तूर पिकावरील अळी आणि बुरशी नियंत्रणासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. त्यांच्याकडून याविषयीचा सल्ला घ्यावा. योग्य उपाय योजना केल्यास तूर पिकांवरील बुरशी आणि बुरशीचे नियंत्रण होईल.

पहिली फवारणी

तुरीवर पहिली फवारणी फुलोरा आणि कळी अवस्थेत करावी. प्रतिबंधक उपाय म्हणून सुरूवातीला 5 टक्के निंबोळी अर्क अथवा अझाडिरेक्टन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिळसून फवारावे

जैविक नियंत्रणासाठी HNPV 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शिफारशीनुसार, बुरशी नाशकाचा वापर करावा

घाटे अळी आणि शेंगमाशीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाची शिफारस आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य रासायनिक फवारणी करावी.

Follow Us
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा