Ventilator 2: ‘तेच सगळे कामेरकर, पुन्हा एकदा..’ प्रियांका चोप्राकडून ‘व्हेंटिलेटर 2′ सिनेमाची घोषणा
Ventilator 2: अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये प्रियांकाने मोठी घोषणा केली आहे. ‘व्हेंटिलेटर 2' सिनेमाची घोषणा अभिनेत्रीने केली आहे.

Ventilator 2: ‘व्हेंटिलेटर’ सिनेमातील ‘बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना..’, हे गाणं आजही अनेकांच्या आवडतीचं आहे. गाणंच नाही तर, सिनेमाने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि अनेक पुरस्कार जिंकले. ‘व्हेंटिलेटर’ सिनेमाच्या यशानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ‘व्हेंटिलेटर 2′ सिनेमाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर अक पोस्ट शेअर करत प्रियांकाने ‘व्हेंटिलेटर 2′ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणून सर्वत्र आता ‘व्हेंटिलेटर 2′ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, ‘व्हेंटिलेटर’ सिनेमाने दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या कामेरकर कुटुंबानं प्रेक्षकांना हसवलं, आणि भावूक देखील केलं.
सिनेमातील काही प्रसंग, व्यक्तीरेखा, त्यांचे स्वभाव आणि गंमतीशीर संवात आणि भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या लक्षात राहिले… आता कामरेकर कुटुंबाची गोष्ट पुढे नेण्यासाठी दिग्दर्शक राजेश मापुस्कर सज्ज झाले आहेत. ‘तेच सगळे कामेरकर, पुन्हा एकदा 10 वर्षांनंतर… त्यांच्यातले काही गेले, काही राहिले… गेलेले हसतायत आणि राहिलेले…!’ शा मिश्किल शब्दांत ‘व्हेंटिलेटर 2’ ची घोषणा करण्यात आली आहे. ‘घ्या रे घ्या सारे घ्या…’, ही टॅग लाईन तर सर्वांचं लक्ष वेधत आहे.
View this post on Instagram
सिनेमाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, “‘व्हेंटिलेटर’ या सिनेमासोबत माझ्या असंख्य आठवणी आणि भावना जोडल्या आहे. सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम मी आजही विसरू शकलेलो नाही. तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच विश्वात परतताना एक वेगळाच आनंद आणि जबाबदारीची जाणीव आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.”
पोस्ट शेअर करत प्रियांका म्हणते, ‘व्हेंटिलेटर’ला मिळालेलं प्रेम आमच्यासाठी नेहमीच खास राहिलं आहे. या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळं या कथेचा पुढचा भाग घेऊन येणं हा आमच्यासाठी आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय आहे. सिनेमाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. लवकरच सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. आता सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
