
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण चपाती खाणे टाळतात. चपातीने रक्तातील साखर वाढत असल्याचे सांगून चपाती पूर्णपणे बंद करतात आणि भाकरी खातात.

चपातीपेक्षा कधीही भाकरी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि ती पचनासाठीही हलकी असते. मात्र, भाकरी नेमकी कोणती खावी, असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

अनेकजण बाजरीची भाकरी खातात. बाजरी आपल्या शरीरासाठी चांगली असते. ज्यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे बाजरीची भाकरी हिवाळ्यात अधिक फायदेशीर कारण बाजरी गरम असते.

वजन कमी करण्यासाठी नाचणीची भाकरी देखील फायदेशीर आहे. नाचणीमध्ये अनेक हेल्दी घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

राजगिऱ्याची भाकरी देखील शरीरासाठी चांगली आहे. राजगिऱ्याने एनर्जी मिळते. ग्लूटन फ्री राजगिरा असतो. त्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर असते.