हात – पायांची बोटं कायम राहतात थंड, ‘या’ समस्यांकडे करू नका दुर्लक्ष… योग्य वेळेत घ्या उपचार

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्याते वाईट परिणाम भविष्यात होऊ शकतात. जर तुमच्या हात - पायाची बोटे कायम थंड राहत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नकी. थंड हवामान, रक्ताभिसरण कमी होणं, अशक्तपणा, मधुमेह किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता... यांसारख्या अनेक कारणामुळे हात - पायाची बोटे थंड असू शकतात.

| Updated on: Nov 07, 2025 | 2:33 PM
1 / 5
हृदयाकडून हात-पायांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नसल्यामुळे देखील बोटं थंड पडतात. थायरॉईड कमी झाल्यास शरीरातील चयापचय कमी होतो आणि उष्णता निर्माण कमी होते. अशात डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

2 / 5
रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे देखील बोटे थंड पडतात. यामुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते; त्यामुळे शरीराच्या टोकांपर्यंत उष्णता कमी पोहोचते. अशात आरोग्यदायी पदार्थ खायला हवेत...

3 / 5
दीर्घकाळ साखरेचे प्रमाण जास्त राहिल्यास रक्तवाहिन्या व नसांवर परिणाम होतो, त्यामुळे हात-पाय थंड आणि सुन्न वाटतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी देखील काळजी घेतली पाहिजे.

4 / 5
बोटं थंड राहू नये म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता... तुम्ही रोज 45 मिनिटं चालल्यास, योगा, सायकलिंग केल्याने रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.  झोप अपुरी किंवा अनियमित असल्यास शरीराचं तापमान नियंत्रण विस्कळीत होतं.

5 / 5
दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहू नका. दर 1 तासाला थोडं चालावं. तीळ, मोहरी किंवा नारळाच्या तेलाने हलकी मालिश करा.  यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि उष्णता टिकते. अशा परिस्थितीत संतुलित आहार व योग्य झोप आवश्यक आहे.