सिंधुदुर्गातून हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना,दर किती मिळाला ?
आंब्याला फळाचा राजा म्हटले जाते. त्यात हापूस आंबा हा कोकणला सर्वाधिक नफा मिळवून देणारे फळ म्हटले जाते. मात्र, हापूस आंबा सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात बाजारात येतो. मात्र, सिंधुदुर्गातून ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याची पहिली पेटी दिवाळीच्या मुहूर्तावर वाशी मार्केटला रवाना झाली आहे.

हापूस आंबे म्हटले की एप्रिल आणि मे महिन्याची वाट पाहायला लागते. परंतू आता चक्क ऑक्टोबरातच सिंधुदुर्गातून हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली आहे.
कोकणचा राजा म्हटला जाणारा हापूस आंबा हा चवीला अतिशय मधूर आणि अविट गोडीचा असता.या आंब्याला परदेशातही मागणी असते.
हापूस आंबे म्हटले की उन्हाळ्याची वाट पाहायला लागते. एप्रिल महिना आला की बाजारात आंब्यांचा सुंगध दरवळायला लागतो. एप्रिल महिन्यातील हापूस आंबा हा महागडा असतो. मे महिना आला की त्याची किंमत कमी होते आणि तो सर्वसामान्यांना परवडतो.
कोकणचा राजा हापूस आंब्याची पहिली पेटी हंगामापूर्वीच वाशी मार्केटला रवाना झाली आहे. देवगडच्या गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार निलेश बांदकर यांनी ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याचे उत्पादन घेत नवा प्रयोग यशस्वी केला आहे.
संकष्टीच्या मुहूर्तावर काढलेली ही पेटी शुक्रवारी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल होणार आहे. विशेष म्हणजे, दिवाळी पाडव्याला आणखी सहा ते सात पेट्या बाजारात पाठवण्याचे नियोजन असून, या हंगामापूर्वीच्या हापूसला किती दर मिळतो,हे पाहणे महत्वाचे असणार आहे.