आधी कळसूबाई अन् आता सिंहगडाचा ‘तानाजी कडा’ अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर, कोण आहे ‘तो’?

सह्याद्री गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी मोठा विक्रम रचला आहे. तानाजी यांनी आधी कळसूबाई त्यानंतर आता सिंहगडाचा 'तानाजी कडा' अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर केल्या आहे. ज्यामुळे त्यांचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: May 18, 2026 | 3:43 PM
1 / 5
कोणत्याही दोरखंडा शिवाय सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे.

कोणत्याही दोरखंडा शिवाय सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे.

2 / 5

आंबेवाडी गावचे रहिवासी आणि 'महाराष्ट्र रेंजर्स' संस्थेचे गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी आपल्या अद्भूत कौशल्याच्या जोरावर दोन मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तानाजी यांनी सह्याद्रीतील सर्वात कठीण मानले जाणारे टप्पे विक्रमी वेळेत पार केले.

3 / 5

त्यांनी नुकताच सिंहगडाचा ऐतिहासिक आणि थरारक 'तानाजी कडा' कोणत्याही दोरखंड अथवा तांत्रिक उपकरणांशिवाय अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर करून क्रीडा जगताला अचंबित केले आहे.

4 / 5

यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या कळसूबाई शिखरावरही विक्रमी चढाई केली होती.विनादोर चढाई अन अंगावर काटा आणणारा थरार ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आला आहे.

5 / 5

सिंहगडाच्या पश्चिम बाजूला असलेला 'तानाजी कडा' हा अत्यंत सरळ आणि छाती दडपून टाकणारा आहे. इ.स. 1670 मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी याच कड्यावरून चढाई करून गड जिंकला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us