Winter beer, best beer for winter : थंडीत कोणती बिअर प्यावी? कॉफी फ्लेवरपासून हेवी टेस्टपर्यंतच्या 5 बिअरची चर्चा
थंडीच्या दिवसांत बिअर पिणाऱ्यांसाठी काय पर्याय आहेत? बिअरप्रेमींना वेगवेगळे फ्लेवर्स अनुभवता यावेत यासाठी 5 पर्याय समोर आले आहेत. यात रोस्टेड कॉफी आणि एस्प्रेसो फ्लेवर असलेल्या स्टाउट बिअरपासून ते लोकप्रिय लाइट बिअरपर्यंतच्या पर्यायांचा समावेश आहे.

बिरा बूम स्टाउट: या बिअरमध्ये रोस्टेड कॉफीचा फ्लेवर मिळतो. कॉफीच्या चवीमुळे हिवाळ्यात ही बिअर पिण्याचा अनुभव वेगळा असल्याचा दावा करण्यात येतो.
सिंबा स्टाउट: या बिअरमध्ये रोस्टेड एस्प्रेसोचा फ्लेवर आहे. कॉफीप्रेमींना आवडू शकेल अशी ही बिअर असल्याचे सांगण्यात येते
कोरोना एक्स्ट्रा: क्लब आणि बारमध्ये लोकप्रिय असलेल्या या बिअरमध्ये लिंबाचा रस मिसळून गरम स्टार्टरसोबत घेण्याची पद्धत प्रचलित आहे.
हेनेकेन सिल्व्हर: जास्त हेवी बिअर नको असणाऱ्यांसाठी हेनेकेन सिल्व्हर हा चांगला पर्याय असल्याचे सांगण्यात येते.
पॉलानर वीट बिअर: या यादीत पॉलानर वीट बिअरला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. ही बिअर प्रामुख्याने मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असते. गरम चकण्यासोबत तिचा आस्वाद घेण्यात वेगळीच मजा असल्याचे जाणकार सांगतात.
टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. या लेखातील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यपानास प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश नाही.