
नाशिकमधील फुलांची बाग तब्बल 9 एकरामध्ये उभारलीय. त्यात फुलांच्या तब्बल दीड लाख कुंड्या आहेत.

त्र्यंबकेश्वर भागातील या बागेत येताच कुणाचेही मन ताजे होते. आपण एका वेगळ्याच विश्वास प्रवेश केल्याचा भास होतो.

नाशिकमधल्या या बागेत देशी, आंतरराष्ट्रीय फुले आहेत. रोज तब्बल हजारांपेक्षा जास्त पर्यटकांची पावले इकडे वळतात.

युरोप, रशिया, फ्रान्स, हॉलंडमध्ये सापडणारी पिटुनिया, झिनिया, डायनथस, अंथरीयम, कोलयास ही फुले येथे आहेत.

भारतात आढळणारे सूर्यफूल, बोगणवेली, झेंडू, गुलाब, कमळ अशी जवळपास 5 लाख विविधरंगी फुले बागेमध्ये आहेत.

नाशिककर आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. यंदाच्या हिवाळातील 4 महिन्यांसाठी ही बाग सर्वांसाठी खुली असेल.

बागेतील फुलांची पर्यटकांना इत्यंभूत माहिती मिळावी म्हणून येथे अतिशय अभ्यासू गाईड देखील ठेवण्यात आले आहेत.

बागेतील फुलांची रचना मोर, गाडी, घर, हार्ट अशा विविध थीमच्या माध्यमातून करून हे उद्यान सजविण्यात आले आहे.

तुम्ही नाशिकमधील असा वा इतर कुठले. मात्र, एकदा या फुलांच्या बागेला जरूर भेट द्या आणि फूलच होऊन जा.