संगमनेर तालुक्यात दक्षिण दिशेला असणारा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर नैसर्गिक सौदर्याची खाणच आहे.
या ठिकाणी दिसणारी विविध प्रकारची रानफुलं आणि आणि हिरवाई पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.
या डोंगर रांगांवर चहुदिशांनी हिरवळीची जादू आहे.
अनेक प्रकारची झाडं-झुडपं, वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं आणि वेगवेगळे पशुपक्षी अशी मोठी मेजवानी या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळते.
या डोंगर रांगेवर अनेक ठिकाणी पठाराचा भागही आहे.
या ठिकाणी अगदी नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरव्यागार गवताची दाट चादर पसरलेली दिसते.
ज्यांना उंचावरुन आजूबाजूच्या निसर्गाच्या सौदर्यांचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही डोंगर रांग पर्वणीच आहे.
या डोंगर रांगांवर आजूबाजूच्या विस्तृत परिसराची निसर्गाने फुललेली दृश्य डोळ्यात साठवणे असो की ट्रेकिंग करत या भव्य डोंगराचे चढउतार अनुभवत निवांत चढाई करणे असे दोन्ही मार्ग पर्यटकांना भरभरुन आनंद देतात.
या डोंगर रांगेवर अनेक प्रकारची रानफुलं दिसतात.
फुलांसोबतच या ठिकाणी विविध प्रकारचं गवतही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं.
ऐन पावसाळ्यात या ठिकाणी अनेक प्रकारचे हिरवेगार गवत डोंगराचं सौदर्य वाढवतात.
फुलांसोबतच या ठिकाणी अनेक प्रकारचे वन्यजीवही पाहयला मिळतात.
हिरवंगार गवत आणि त्यावर आलेली इवली इवली सुंदर फुलं निसर्गाच्या सौदर्यदृष्टीचीच प्रचिती देतात.
या फुलांची रंगसंगती आणि त्यांचा आकार पर्यटकांना आकर्षून घेतो.
एकूणच संगमनेरमधील निसर्गसंपन्न डोंगरांची ही रांग प्रसिद्ध पर्यटन स्थळ नसलं, तरी निसर्गाचा आनंद घेण्यासाठीचा निवांत ठिकाण आहे.