
बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी भात खाणे बंद करतात. आपल्याकडे जवळपास लोकांना वाटते की, भाताचे सेवन केल्याने वजन वाढते.

सर्वांनाच जेवणात भात लागतो. मात्र, वाढलेले वजन बघता भात खाणे टाळतात. मात्र, जर आपण योग्य पद्धतीने भाताचे सेवन केले तर वजन वाढणार नाही.

जेवणात आपण किती भात खातो हे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर शक्यतो एक वाटीपेक्षा अधिक भात खाऊ नका.

कायम लक्षात ठेवा की, जेवणाच्या अगोदर सलाड खा. यामुळे तुमचे खाण्यावर नियंत्रण राहिल आणि अतिप्रमाणात तुम्ही अन्न खाणार नाहीत.

शक्यतो तुम्ही दुपारच्या जेवणात भात खा. रात्री भात खाणे टाळा. भातासोबत वरण किंवा आंमटीही खाऊ शकता. ज्यामुळे तुम्ही भात कमी खाल.