PHOTO : जाड आणि चमकदार केसांसाठी ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की करून पाहाच!

| Updated on: Jun 05, 2021 | 5:02 PM

चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

1 / 5
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.

2 / 5
अॅपल व्हिनेगर एक नैसर्गिक क्लीन्सर म्हणून ओळखले जाते. हे केसांवर लावण्याने केवळ केस चांगले आणि मऊ राहतात. केस स्ट्रेट करण्यासाठी दोन कप पाण्यात 3 चमचे अॅपल व्हिनेगर घालावे. त्यानंतर अर्ध्या तासांनी केस धुवा. यामुळे आपले केस स्ट्रेट होण्यास मदत होईल.

3 / 5
नारळाचे दूध आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. अर्धा कप नारळाचे दूध घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या केसांना लावा. वीस ते तीस मिनिटांनंतर आपले केस थंड पाण्याने धुवा. (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

4 / 5
2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घेऊन, त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी केस धुवून टाका. बेकिंग सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.

5 / 5
रीठा केसातील कोंड्याच्या समस्येवर देखील चांगला उपाय आहे. केसांतील कोंडा काढून टाकण्यासाठी रीठा पाण्यात भिजत ठेवून, नंतर त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा. या हेअर पॅकच्या निअय्मित वापरणे कोंड्याची समस्या नाहीशी होईल. आंघोळ करण्यापूर्वी आपण पेस्ट केसांमध्ये लावून नंतर केस धुवू शकता.