तुकाराम मुंढे यांचा दणका, समोसा, वडापावची जागा थेट पोहे आणि ताकाने घेतली, आता..

तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून राज्यभरात जोरदार कारवाया केल्या जात आहेत. त्यामध्येच शाळेच्या मेन्यूमध्येही मोठा बदल करण्यात आला. तुकाराम मुंढे अन्न सुरक्षेबद्दल मोठे पाऊले उचलताना दिसत आहेत.

| Updated on: Aug 20, 2026 | 6:35 PM
1 / 5
मुंबईत ज्या शाळा येतात, त्यांना वडापाव, कोला, समोसा विकण्यावर बंदी घातली आहे. राज्यभरातील शाळांना 50 मीटरच्या परिसरात कॅलरी वाढवणारे पदार्थ विकले जाऊ नये, या आदेशांची अंमलबजावणी केली जातंय. तुकाराम मुंढे यांनी हा मोठा निर्णय घेतला.

मुंबईत ज्या शाळा येतात, त्यांना वडापाव, कोला, समोसा विकण्यावर बंदी घातली आहे. राज्यभरातील शाळांना 50 मीटरच्या परिसरात कॅलरी वाढवणारे पदार्थ विकले जाऊ नये, या आदेशांची अंमलबजावणी केली जातंय. तुकाराम मुंढे यांनी हा मोठा निर्णय घेतला.

2 / 5

मुंबईतल्या शाळेत आता कँटीनमध्ये वडापाव, कोला, समोसा ऐवजी आता पोहे, इटली, शिरा, डोसा, उपमा हे पदार्थ मिळत आहेत. यासोबत शीतपेयांची जागा आता ताकाने घेतली.

3 / 5

शाळा परिसरात जंक फूड, तत्सम शीतपेय, याची विक्री करू नये, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी काढले. विद्यार्थ्यांना सुरक्षित अन्न दिले पाहिजे, हा नियम 2020 चा आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जातंय.

4 / 5

मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांनी आपला मेन्यू बदलला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण आयुक्तांची भेट घेतली.

5 / 5

आठवड्याभरात आदेशाची अंमलबजावणी करावी. मुख्याध्यापक, प्राचार्य आणि अन्न समितीच्या प्रमुखांना याबाबत कार्यक्रम घेण्याचे निर्देश तुकाराम मुंढे यांच्याकडून देण्यात आलीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us