11 वर्षे फक्त त्याच्या नावानेच गाजली फिल्मची कथा; छप्परफाड कमाई तरी ना मानधन घेतलं ना क्रेडिट

भारतीय सिनेसृष्टीत एक अशी फ्रँचाइजी आहे, जिची कथा एका अशा पात्राभोवती फिरते, ज्याला पडद्यावर फक्त पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ मिळाला. नंतर त्याच्याच नावाने पुढील फ्रँचाइजी गाजले.

| Updated on: Oct 28, 2026 | 11:25 AM
1 / 5
भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून इतका चांगला प्रतिसाद मिळाला आहे की निर्मात्यांनी त्यांच्या फ्रँचाइजी बनवल्या आहेत. गोलमाल, हेराफेरी, धमाल आणि सिंघम या अशाच काही फ्रँचाइजी आहेत. पण यापैकी जवळजवळ सर्वच चित्रपटांमधील कथा त्याच पात्रांभोवती फिरते, जी पडद्यावर दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का, बॉलिवूडमध्ये एक अशी फ्रँचाइजी आहे, जिचे आधीच तीन चित्रपट आले आहेत. पण ज्या पात्राभोवती कथा फिरते, त्याची भूमिका फक्त 15-20 मिनिटांची होती आणि तीही फक्त पहिल्या चित्रपटात. तो अभिनेता त्यानंतरच्या भागांमध्ये दिसत नाही.

2 / 5

हा चित्रपट अजय देवगणचा असून त्याचं नाव 'दृश्यम' असं आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग, रहस्य आणि अनपेक्षित वळण आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. मात्र, या संपूर्ण कथानकाचा पाया ठरलेलं एक पात्र म्हणजे सॅम अर्थात समीर देशमुख. विशेष म्हणजे, चित्रपटात या पात्राचा वावर मर्यादित होता, तरी त्याच्या मृत्यूभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहिली.

3 / 5

आता तब्बल 11 वर्षांनंतर या पात्राची आणि ते साकारणाऱ्या अभिनेत्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. हा अभिनेता म्हणजे ऋषभ चड्ढा. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणने विजय साळगावकरची भूमिका साकारली होती, तर तब्बूने मीरा देशमुख या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. मीरा देशमुखचा मुलगा समीर उर्फ सॅम याच्या मृत्यूमुळे चित्रपटातील रहस्याला सुरुवात होते.

4 / 5

सॅम हा श्रीमंत आणि बिघडलेल्या स्वभावाचा तरुण दाखवण्यात आला आहे. तो विजयची मुलगी अंजू हिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो विजयच्या घरी पोहोचतो. तिथे झालेल्या संघर्षादरम्यान अंजूच्या हातून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि त्याचा मृत्यू होतो. यानंतर विजय आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुरावे लपवण्यापासून ते पोलिसांची दिशाभूल करण्यापर्यंत अनेक युक्त्या वापरतो.

5 / 5

ऋषभ चड्ढाने गेल्या दोन वर्षांत कोणताही नवीन अभिनयप्रकल्प स्वीकारलेला नसल्याचं वृत्त आहे. मात्र, तो मनोरंजनविश्वापासून पूर्णपणे दूर गेलेला नाही. सध्या तो स्टोरीटेलिंग आणि कविता सादर करण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडला जात आहे. ‘दृश्यम’मध्ये सॅमची भूमिका मर्यादित असली, तरी त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण कथानकाला दिशा मिळाली. अजय देवगणच्या विजय साळगावकर या पात्राची बुद्धिमत्ता, पोलिसांचा तपास आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी केलेली धडपड या सगळ्याच्या केंद्रस्थानी सॅम होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us