
नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसत आहे. नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवणला धुवाधार पावसाने झोडपले आहे. लेंडी नदीला पूर आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, मालेगावमध्ये तब्बल 3 हजार हेक्टरवले पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आज होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं गोदा घाटच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे.

नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये गोदापात्रातील सर्व दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी दुपारी तीननंतर वाढण्याचा अंदाज आहे. नदी परिसरात कोणीही फिरकू नये, अशा सूचना आहेत.

गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. पुराचे चौमाळ पाणी सध्या तरी नियंत्रित आहे. मात्र, ते कधी रौद्ररूप धारण करेल याची खात्री नाही.