Higest Paid Actors : सर्वात जास्त फी कोणाची ? भारतातल्या सर्वात महागड्या ॲक्टर्सची नावं माहीत आहेत का ? चौथं नाव तर..

सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक मोठ्या चित्रपटांवर काम सुरू आहे. कमी बजेटचा चित्रपटही 50 कोटी रुपये खर्चाचा असतो. तर सर्वात महागडा चित्रपटही शेकडो कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला जातो. दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, बक्कळ कमाई करतात, मग मानधनाच्या बाबतीत कलाकार मागे का राहतील? सध्या प्रत्येक नावाजलेला स्टार, अभिनेता एका चित्रपटाच्या निर्मितीइतकंच मानधन घेतो. देशातले सर्वात महागडे अभिनेते कोण ते जाणून घेऊया.

| Updated on: Aug 23, 2025 | 4:28 PM
1 / 8
अल्लू अर्जुन: तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या भारतातील सर्वात महागडा अभिनेता आहे. 'पुष्पा' चित्रपटातून संपूर्ण भारतात स्टार बनलेल्या अल्लूने या चित्रपटाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याने सर्वाधिक कमाई करून हिंदी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये अव्वल स्थान पटकावले. रिपोर्टनुसार, त्याने 300 कोटी रुपये फी घेतली होती.

2 / 8
शाहरुख खान: या यादीत बॉलिवूडचा किंग खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2023 साली त्याने 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' अशा चित्रपटांनी बॉस्क ऑफीसवर खळबळ उडवून दिली. दोन चित्रपटांनी 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. खरं तर, शाहरुख प्रत्येक चित्रपटासाठी 150 ते 250 कोटी रुपये आकारतो.

3 / 8
थलापती विजय: तमिळ चित्रपटसृष्टीतील मेगास्टार जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ ​​थलापती विजय हाही बक्कळ फी घेतो. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम - हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. विजय त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी 130 ते 275  कोटी रुपये फी आकारतो.

4 / 8
रजनीकांत: दक्षिण चित्रपटसृष्टीतील थलैवा अर्थात रजनीकांत यांचं नावही या यादीत आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील या सर्वात मोठ्या सुपरस्टारला केवळ देशातच नाही तर जगभरात मोठी मागणी आहे. सध्या ते कूली चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, ते चित्रपटासाठी 125 ते 270 कोटी रुपये फी घेतात.

5 / 8
आमिर खान: मिस्टर परफेक्शनिस्ट हा पाचवा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी 100 ते 275 कोटी रुपये घेतो. 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी नुकताच आलेला सितारे जमीन प हा त्याचा चित्रपट खूप गाजतोय, लोकांनाही तो खूप आवडला.

6 / 8
प्रभास: गेल्या काही वर्षांपासून प्रभासला केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप मागणी आहे. 'बाहुबली' द्वारे खळबळ माजवणारा हा अभिनेता देखील या यादीत आहेत. तो प्रत्येक चित्रपटासाठी 100 ते 200 कोटी रुपये आकारतो.

7 / 8
अजित कुमार: तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात स्टायलिश आणि हँडसम, देखणा अभिनेता अजित कुमार सातव्या क्रमांकावर आहे. तो एका चित्रपटासाठी 105 ते 165 कोटी रुपये घेतो.

8 / 8
सलमान खान: या यादीत भाईजान आठव्या स्थानी आहे. रिपोर्ट्सनुसार,  सलमान खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी १०० ते १५० कोटी रुपये घेतो. गेल्या काही काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. मात्रे एकेकाळी त्याने लागोपाठ अनेक हिट चित्रपट दिले.