
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे उत्तम अभिनेते आहेत. अभिनयात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. काही जणं गाण्यांवर मस्त लिप सिंक करतात. पण काही स्टार्स असेही आहेत, ज्यांनी चौकटीबाहेर पडून एखादं गाणं स्वत:च गायचा निर्णय घेतला. त्यांची गाणी तर लोकप्रिय झालीच , पण त्यांचा आवाजही अनेकांना आवडला. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खानपासूनते आमिरपर्यंत अनेक अभिनेत्यांनी आत्तापर्यंत एकदा तरी गाणं गायलं आहे. या यादीत एक वेगळंच नावही आहे, जे वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

अमिताभ बच्चन बिग बी हे बॉलिवूडचे शहेनशाह तर आहेतच, पण त्यांनी गाण्यातही हात आजमावला आहे. 'मेरे अंगने मे तुम्हाला क्या काम है', 'मिस्टर नटवरलाल' मधलं 'मेरे पास आओ मेरे दोस्तो', तसंच 'वझीर' चित्रपटातलं 'यारी', अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत.

अनेक वर्षांपूर्वा आलेल्या' 'गुलाम' चित्रपटातली सगळीच गाणी गाजली. पण ' ए क्या बोलती तू.. आती क्या खंडाला ' हे गाणं अनेकांना आठवत असेल. खुद्द आमिरनेच ते गायलं होतं, जे जबरदस्त हिट ठरलं, आजही अनेकांना हे गाणं तोंडपाठ असेल.

शाहरुख खान शाहरुख खानने 'जोश' चित्रपटातील 'अपुन बोला तू मेरी लैला' या संवादात्मक रॅप-शैलीतील गाण्याद्वारे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. ते चार्टबस्टर नव्हते, तरी अनोख्या शैलीमपुळे हे गाणं खूप गाजलं.

मुझ में तू में अक्षय कुमार स्पेशल २६ मधील या भावनिक प्रेमगीताला अक्षयने पर्सनल टच दिला. हा त्याचा गाण्याचा पहिलाच प्रय्तन होता. हे गाण ंखूप हिट ठरलं नाही, तरी त्यासाठी अक्षयचं बरंच कौतुक झालं. नंतर मात्र तो परत कधी गाताना दिसला नाही.

अभिषेक बच्चन वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेता अभिषेक बच्चन यानेही गाणं गाण्याचा प्रयत्न केला. 'ब्लफमास्टर' चित्रपटातलं त्याचं 'राईट हिअर राईट नाऊ - एक मैं और एक तू है ' हे गाणं प्रचंड गाजलं. आजाही ते अनेकांच्या आवडीच गाणं आहे. प्रियांका चोप्राही या चित्रपटात होती.

सलमान खान हँगओव्हर हे गाणं तसेच हॅलो ब्रदरमधलं चांदी की डाल पे सोने का मोर, हे गाणं गाऊन भाईजान सलमान खान यानेही गाण्यात नशीब आजमावलं. ही गाणी बरीच गाजली. सलमानचे चाहते आजही या गाण्यासाठी वेडे आहेत.

सेनोरिटा - ऋतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर या तिघांनी "जिंदगी ना मिलेगी दोबारा" या स्पॅनिश-इंडियन फ्यूजन ट्रॅकमध्ये असलेल्या गाण्यामध्ये एक अनोखी ऊर्जा भरली. २०११ साली आलेल्या या चित्रपटातील गाण सुपरहिट तर ठरलंच, पण जाही अनेक पार्टीमध्ये हा ट्र2क हमखास वाजतोच. या पिक्चरचा आणि गाण्याचं आजही तितकंच फॅन फॉलोईंग आहे.

आयुष्मान खुराना आयुष्मानने विकी डोनरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंच. पण त्यातील पानी दा रंग, हे गाणंही त्याने सुरेल आवाजात गायलं. स्पर्म डोनेशनसारख्या वेगळ्या विषयावर असलेला हा चित्रपट खूप गाजला. त्यात आयुष्मान आणि यामी गौतमी फ्रेश जोडीही लोकांना खूप आव़ली. त्यातच हे गाणं तर कित्येकांच फेव्हरिट आहे. आजही अनेक लोकांच्या प्ले लिस्टमध्ये हे गाणं हमखास असतंच.