Dia Mirza : तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला धमकावता..विषय वाढला, बॉलिवूडमधून फक्त रिचा चड्ढा दिया मिर्झाच्या पाठिशी खंबीरपणे उभी

Dia Mirza : अभिनेत्री दिया मिर्झा सध्या चर्चेत आहे. सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये बोलताना दियाने पर्यावरणाबद्दल मीच नाही, माझा मुलगाही किती जागरुक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण याचा उलटा परिणाम झाला. दियाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

| Updated on: Jul 03, 2026 | 8:19 AM
1 / 5
एकदा दियाच्या घरी डिलिव्हरी बॉय प्लास्टिक पिशवीतून नारळ पाणी घेऊन आलेला. सोबत प्लास्टिक स्ट्रॉ सुद्धा होती. दिया मिर्झा पर्यावरणाबद्दल प्रचंड जागरुक आहे. तिने तिच्या पाच वर्षांच्या मुलाला अव्यान आझाद रेखीला सुद्धा पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले आहेत.

एकदा दियाच्या घरी डिलिव्हरी बॉय प्लास्टिक पिशवीतून नारळ पाणी घेऊन आलेला. सोबत प्लास्टिक स्ट्रॉ सुद्धा होती. दिया मिर्झा पर्यावरणाबद्दल प्रचंड जागरुक आहे. तिने तिच्या पाच वर्षांच्या मुलाला अव्यान आझाद रेखीला सुद्धा पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले आहेत.

2 / 5

डिलिव्हरी बॉयच्या हातात प्लास्टिक पिशवी आणि प्लास्टिक स्ट्रॉ बघून दियाच्या पाच वर्षांच्या मुलाने त्याला सुनावलं. "तुम्ही प्लास्टिकमधून ते पाणी काढा आणि त्या स्ट्रॉसह ती पिशवी घेऊन जा” असं अव्यानने त्याला सुनावलं. दियाने पॉडकास्टमध्ये हा किस्सा सांगितल्यानंतर सोहाने सुद्धा तिच्या मुलांच कौतुक केलं.

3 / 5

पण सोशल मीडियावर अनेकांना दियाच्या मुलाचं हे वागणं पटलं नाही. त्यांनी तिला ट्रोल केलं. प्लास्टिक पिशवीत नारळ पाणी नको असेल तर बाहेर गाडीवर जाऊन नारळपाणी प्या. डिलिव्हरी बॉयवर एक लहान मुलगा रागावतो आणि याला शौर्य म्हणतात असं म्हणत दियाला ट्रोल करण्यात आलं.

4 / 5

या सगळ्या वादात आता बॉलिवूडमधून अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्यामागे उभी राहिली आहे. "या संतापामधून सेलिब्रिटी जेव्हा सामाजिक मुद्यांवर बोलतात, तेव्हा त्यांना कसं ट्रोल केलं जातं, हे दिसून येतय. आम्ही कलाकारांनी का गप्प बसायचं?" अनेक कलाकार त्यांची मत मांडणं का टाळतात? ते यातून दिसून येत असल्याचं रिचाने सांगितलं.

5 / 5

पाच वर्षाच्या मुलाला धमकावतात असही रिचाने म्हटलं. दिया मिर्झा पर्यावरणासाठी जे काम करते त्याचं सुद्धा रिचा चड्ढाने आपल्या पोस्टमधून समर्थन केलं. रिचा चड्ढाने नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिची मत मांडत असते. बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us