
मलायका अरोरा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट "थामा" मधील एक आयटम नंबर साँग नुकतचं प्रदर्शित झालं. आजकाल बहुतांश चित्रपटात आयटम साँग हे असतंच.

अनेक अभिनेत्री या त्यांच्या आयटम साँग्ससाठी प्रसिद्ध आहेत, मात्र त्या दोन मिनिटांच्या गाण्यासाठी त्या फी देखील तेवढीच तगडी घेतात. फिल्मी दुनियेत आयटम साँगसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री आणि त्या किती पैसे घेतात ते जाणून घेऊया.

मलायका अरोरापासून सुरुवात करूया, तिने "मुन्नी बदनाम" आणि "अनारकली डिस्को चली" यासह अनेक धमाल गाणी सादर केली आहेत. रिपोर्टनुसार, मलायका प्रत्येक गाण्यासाठी1 ते 2 कोटी रुपये घेते.

तर "पुष्पा" मधील "ऊ अंतवा" हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं, इक़े तिकडे तेच गाणं वाजायचं. रिपोर्टनुसार, समंथा रूथ प्रभू एका आयटम नंबरसाठी सुमारे 5 कोटी रुपये मानधन घेते.

अभिनेत्री करीना कपूर उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण ती नाचतेही छान. "दबंग" चित्रपटातील "फेविकॉल" हे गाणं आणि "हलकट जवानी" या आयटम साँगमधील करीनाच्या डान्सची बरीच चर्चाझाली, ती गाणी हीट ठरली. काही रिपोर्ट्सनुसार,करीना प्रत्येक गाण्यासाठी 5 कोटी रुपये मानधन घेते.

सनी लिओन तिच्या अदांसाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत. ती प्रत्येक आयटम नंबरसाठी 3 कोटी रुपये मानधन घेते. तिने "बेबी डॉल" आणि "लैला मैं लैला" सारख्या गाण्यांवर परफॉर्म केलं आहे.

तमन्ना भाटियाच्या आयटम साँग्सची मागणी बरीच वाढली आहे. तिने "स्त्री 2" मधील "आज की रात" या गाण्याने चाहत्यांची मनं जिंकली आणि इतर चित्रपटांतही अनेक आयटम नंबरमध्ये नृत्य केलं. रिपोर्टनुसार, तमन्ना ही आयटम साँगसाठी 1 ते 2 कोटी रुपये आकारते.

नोरा फतेही देखील तिच्या डान्ससाठी , मूव्ह्जसाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केली आहेत. असे म्हटले जाते की नोरा प्रत्येक गाण्यासाठी 2 कोटी रुपये घेते.